Breaking News

भानसहिवरे येथील केतन कैलास साळुंके यांची सैन्य दलात अधिकारी म्हणून निवड !

भानसहिवरे येथील केतन कैलास साळुंके यांची सैन्य दलात अधिकारी म्हणून निवड !


नेवासा तालुका प्रतिनिधी :
नेवासा तालुक्यातील भानसहिवरे येथील केतन साळुंके यांची युपीएससी परीक्षा देऊन सैन्य दलात अधिकारी म्हणून निवड झाली. या निवडी बद्दल गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या निवडी बदल केतन साळुंखे यांचे नेवासा तालुक्यातील सर्व स्थरातून कौतुक होत आहे.
केतन कैलास साळुंके यांच्यामुळे भानसहिवरे गावात पहिला सैन्य अधिकारी निर्माण झाल्याची भावना गांवकऱ्यांतून व्यक्त होत असून भानसहिवरा गांवच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला गेला असल्याची भावना गांवकऱ्यांतून व्यक्त होत आहे.