Breaking News

बेलापूर महाविद्यालयाचा स्वातंत्र्याचा वर्धापन दिन साध्या पद्धतीने साजरा !

बेलापूर महाविद्यालयाचा स्वातंत्र्याचा वर्धापन दिन साध्या पद्धतीने साजरा !
 बेलापूर प्रतिनिधी - 
    येथिल बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात 15 आँगस्ट स्वातंत्र्याचा 74 वा वर्धापन सोहळा शासन नियमांचे पालन करुन संपन्न झाला.बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे सदस्य व प्रगतशील शेतकरी शिवदास पाटील महाडिक, अरुणकाका मुंडलिक यांच्या शुभहस्ते संपन्न झाला..त्यांनी सर्वांना भारतीय स्वातंत्र्याच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन राजेश खटोड यांनी प्रास्ताविक केले..कार्यक्रमाचे संयोजन क्रिडासंचालक प्रा.विनायक काळे,डॉ. बाबासाहेब पवार यांनी केले.सह्याद्री दुरदर्शनवाहिनीचे बातमीदार प्रा.ज्ञानेश्वर गवले यांनी कार्यक्रमाचे चलचित्र साकारले.. या सोहळ्यासाठी बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गणपत मुथ्था, उपाध्यक्ष अशोकनाना साळुंके,सचिव अँड.शरद सोमाणी, सहसचिव दिपक सिकची,बापुसाहेब पुजारी,अँड.विजय साळुंके,शेखर डावरे,अनिल तायडे ,तुषार खोडाळ सर्व प्राध्यापक, सेवक कर्मचारी उपस्थित होते..महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.