Breaking News

टाकळी ढोकेश्वर येथील तीन व्यक्ती कोरोना बाधित, आज दुपार पर्यंत पारनेर तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा सहा वर !

टाकळी ढोकेश्वर येथील तीन व्यक्ती कोरोना बाधित, आज दुपार पर्यंत  पारनेर तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा सहा वर !
पारनेर प्रतिनिधी -
     पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील रॅपिड किट च्या माध्यमातून करण्यात आलेल्या चाचणीमध्ये तीन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे.
तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे दिवसभरात ही संख्या आता 6 वर गेली आहे.
   सकाळी प्राप्त झालेल्या शासकीय लॅबच्या अहवालानुसार जेलमधील कैदी, म्हसणे येथील एक व्यक्ती व जामगाव येथील एक व्यक्ती असे तीन कोरोना बाधित आले होते त्यानंतर रॅपिड किटच्या माध्यमातून केलेल्या चाचणीमध्ये टाकळी ढोकेश्वर येथील तीन जण बाधित आढळले आहेत
त्यामुळे टाकळी ढोकेश्वर हे गाव तीन दिवसांसाठी बंद करण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत.