Breaking News

गावक-यां कडून होणारा गौरव ऊर्जा देणारा ठरणार -- रविंद्र आगवण

गावक-यां कडून होणारा गौरव ऊर्जा देणारा ठरणार -- रविंद्र आगवण
 करंजीतील गुणवंतांचा ग्रामपंचायत कडून गौरव 
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
    कोपरगांव तालुक्यात सर्वप्रथम गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करुन त्यांचा यथोचीत सत्कार करण्याचा पायंडा   बिपिनदादा कोल्हे यांनी पाडला  त्यांच्याच मार्गर्शनाखाली करंजी ग्रामपंचायत ने देखील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याची प्रथा गत दोन वर्षापासून सुरुवात केली असुन गावच्या वतीने गावक-यांनी केलेला गौरव विद्यार्थ्यांना भविष्यात निश्चित ऊर्जा  देणारा ठरेल असे प्रतिपादन  करंजी ग्रामपंचायतचे उपसरपंच रविंद्र आगवण यांनी केले.
      कोपरगाव तालुक्याचा प्रथम महिला आमदार स्नेहलता  कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करंजी ग्रामपंचायती च्या वतीने गावातील  १० वी व १२ वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव ग्रामपंचायतच्या वतीने प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्यांला वृक्ष व ट्राफी देऊन    करण्यात आला त्याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उपसरपंच आगवण बोलत होते.  
 . यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती नवनाथ आगवन कोल्हे कारखान्याचे संचालक   भास्कर नाना भिंगारे, सांतोष काजळे, अनिल डोखे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यालयात  सर्व प्रथम आलेले साक्षी अण्णासाहेब कापसे ९१.६० टक्के,  रीतेश भाऊसाहेब आगवन ९१.६० टक्के   व्दितीय क्रमांक साक्षी दत्तात्रय भिंगारे ९०.६० टक्के  तृतीय क्रमांक आश्र्विनी अनिल चरमळ  ८९.२० टक्के  तसेच १२ वी मध्ये लातूर विद्यालय येथील अक्षदा बाळासाहेब ढवळे , तेजश्री अरुण भींगारे ,तसेच १२ वी विज्ञान एस एस जी एम विद्यालय मधुन हृतीका सोमनाथ जाधव,गणेश मच्छिंद्र आगवण ,तेजस कृष्णा शहाणे यासर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कोल्हे कारखान्याचे  संचालक भास्कर नाना भिंगारे उपसभापती नवनाथ आगवन, सरपंच छबु आहेर ,उपसरपंच रविंद्र आगवण ,ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब गुंड, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ फापाळे, अनिल डोखे, बाळासाहेब भिंगारे, गणेश भिंगारे, लक्ष्मण शेळके, आप्पासाहेब आगवान ,भाऊसाहेब शहाणे, गोरख भिंगारे,संतोष काजळे, बाबासाहेब कापसे, संजय उगले , रघुनाथ भिंगारे, राजेंद्र चरमळ, संजय फापाळे , योगेश शिंदे, देविदास भिंगारे,बळीराम थेटे, अनिल चरमळ, रमेश फापाळे यांसह ग्रामस्थ सामाजिक अंतर ठेवून उपस्थीत होते