Breaking News

सांस्कृतिक भवन व्हावे या साठी जागा अधिग्रहित करावी : किरण अढांगळे

सांस्कृतिक भवन व्हावे या साठी जागा अधिग्रहित करावी : किरण अढांगळे
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
     कोपरगाव शहरात मातंग समाजाला सांस्कृतिक भवन उभारणी साठी जागा उपलब्ध करण्यात यावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष किरण अढांगळे यांनी नुकतीच कोपरगाव नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांना एका निवेदनाद्वारे केली आहे
आपल्या निवेदनात पुढे म्हटले की कोपरगाव शहरात सर्वच जाती धर्माचे सांस्कृतिक भवन अस्तित्वात आहे मात्र मातंग समाजाला अद्याप पर्यंत सांस्कृतिक भवन नाही 
कोपरगाव शहरात येवला रोड वर नगर पालिकेच्या माध्यमातून डॉ अण्णा भाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळ्याचे काम प्रगती पथावर आहे मात्र या स्मारकाच्या पाठीमागे बरीच जागा अजून शिल्लक असून या ठिकाणी भव्य असे सांस्कृतिक भवन उभे राहावे या ठिकाणी सांस्कृतिक भवन उभे राहिल्यास अण्णा भाऊ साठे स्मारकाच्या जवळ अतिक्रमण होणार नाही तसेच गावाच्या मुख्य मार्गावर सांस्कृतिक भावनांची उभारणी केल्यास सर्वच समाज बांधवांना विविध कार्यक्रम घेण्यास जागा उपलब्ध होईल
त्या करिता नगर पालिके मार्फत जागा अधिग्रहित करावी व तसा ठराव जनरल मिटिंग मध्ये करावा अशी मागणी करण्यात आली या निवेदनावर अँड.नितीन पोळ सोमनाथ म्हस्के, बाळासाहेब पवार, किरण अढांगळे, सुजल चंदन शिव, राजू रोकडे, भारत रोकडे,राजेंद्र खैरनार, नितीन साबळे प्रवीण शेलार, गंभीर पवार, किरण सोळशे, नाना बत्तीसे, गीतेश पोळ दिपक कांबळे, राकेश कांबळे आदींच्या सह्या आहेत