Breaking News

पोलीस बॉईज असोसिएशन च्या राज्य कार्यकरनी सदस्यपदी नानासाहेब काकासाहेब शिंदे !शिर्डी प्रतिनिधी :-
     पोलीस बॉईज असोसिएशन च्या राज्य कार्यकरनी सदस्यपदी नानासाहेब काकासाहेब शिंदे पाटील यांची निवड. सदर निवड संघटनेचे अध्यक्ष रविभाऊ वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली विकास रत्नाकर सुसर राज्य सरचिटणीस यांनी केली .पोलीस बॉईज संघटना ही पोलीस आणि पोलीस कुटुंबाच्या न्याय हक्कासाठी लढणारी महाराष्ट्रातील एकमेव अराजकीय सामाजिक संघटना आहे .संघटनेच्या प्रयत्नाने पोलिसांच्या मुलांना पोलीस भरती मध्ये पाच टक्के आरक्षण मिळाले आहे.
     राजकीय,सामाजिक कार्यामध्ये अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे काम संघटना प्रत्येक वेळेस करत असते.या निवडीबद्दल छबुराव ताके संपादक दैनिक मराठवाडा केसरी ज्ञानोबा धुमाळ प्रदेश अध्यक्ष वा आ. सखाराम भोजने मराठवाडा अध्यक्ष वा आ दत्तात्रय धोकटे उद्योग आ मराठवाडा अध्यक्ष माणिक निमसे राज्य संघटक वाहतुक आ. यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.