Breaking News

पारनेर तालुक्यात आज दुपारपर्यंत १५ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह, वाढणारी रुग्ण संख्या चिंतेचा विषय !

पारनेर तालुक्यात आज दुपारपर्यंत १५ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह, वाढणारी रुग्ण संख्या चिंतेचा विषय !
पारनेर प्रतिनिधी -
       पारनेर तालुक्यातील कोरोना ची संख्या साडेतीनशे च्या घरात पोचली आहे. आज प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी अहवालामध्ये दुपारपर्यंत १५ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.
      यात वाडेगव्हाण २ जमगाव १ जवळा ३ लोणीमावळा १ वडझिरे १ पारनेर १ पिंपळगाव रोठा २ निघोज २ करुंद २ असे १५ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.
तर पारनेर १ वडझिरे ३ कुरुंद २ डिसकळ २ येथील ८ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहे.
      ज्या गावात कोरोना बाधित सापडले आहे. तेथील १०० मीटर चा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्याचे आदेश पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत.