Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब गाडळकर यांचे निधन !

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब गाडळकर यांचे निधन !
अहमदनगर :
          राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब गाडळकर (वय
३६) यांचे आज (दि.२१) सकाळी खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात वडील, आई, भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी, चार बहिणी, वहिणी असा मोठा परिवार आहे. गाडळकर हे आ. संग्राम जगताप यांच्या अतिशय जवळचे व विश्वासू मित्र म्हणून ते सर्वपरिचित होते. त्यांना दिलेली जबाबदारी ते नेहमी वेळेवर पार पाडीत असे. नागरिकांच्या समस्या सोडविण्यात कायम अग्रेसर भूमिका घेत असत. 
       मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम व उत्सव नियमितपणे पार पाडत होते. सर्वांशी कायम हसत खेळत असणाऱ्या बाबासाहेबांचा मोठा मित्रपरिवार आहे. सर्वांच्या अडचणीस वेळेवर मदत करणारे अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने परिसरात व मित्र परिवारातून हळहळ व्यक्त होत आहे.