Breaking News

अकोले तालुक्यात आढळले १५ नवीन कोरोना बाधित रुग्ण !

अकोले तालुक्यात आढळले १५ नवीन कोरोना बाधित रुग्ण .!


अकोले प्रतिनिधी :
   अकोले तालुक्यात आज १५ नवीन को रोना बा धीत रुग्ण आढळले आहे. आज देवठाण प्राथमिक आरोग्य केंद्रात  घेण्यात आलेल्या ॲन्टीजन टेस्ट मध्ये गणोरे येथील ३८ वर्षीय पुरुष,३२ वर्षीय महिला,०८ वर्षीय मुलगा,  पिंपळगाव निपाणी येथील ३० वर्षीय पुरूष अशा  चार व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला तर धामणगाव आवारी येथे  घेण्यात आलेल्या ॲन्टीजन टेस्टध्ये आदिवासी भागातील वारंघुशी येथील ३५ वर्षीय पुरूष,४५ वर्षीय महीला धुमाळवाडी येथील ६५ वर्षीय पुरुष,१५ वर्षीय मुलगा,३१ वर्षीय महीला अशा पाच व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.  खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात गर्दणी येथील  ६० वर्षीय पुरुष व धुमाळवाडी येथील ३५ वर्षीय पुरुष अशी ११ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला. 
      अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात ब्राम्हणवाडा येथील ५७ वर्षीय महीला,कोतुळ येथील ३० वर्षीय महीला,१६ वर्षीय तरुणी,१५ वर्षीय युवक अशा०४ व्यक्ती पॅाझिटीव्ह आल्या असुन आज रविवारी दिवसभरात एकुण १५ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.

----------