आमदार आशुतोष काळे च्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव मध्ये वृक्षारोपण करंजी प्रतिनिधी- आज ४ ऑगस्ट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच...
आमदार आशुतोष काळे च्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव मध्ये वृक्षारोपण
करंजी प्रतिनिधी-
आज ४ ऑगस्ट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शहर परिसरातील ग्रीन फोरम, साई समर्थ प्रतिष्ठाण व सुभद्रानगर प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त विद्यमाने सुभद्रानगर परीसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी ग्रीन फोरमचे सुमित भाट्टड शेखर भोंगळे, शेटे सर, अनुप पटेल,अनिरुध्द काळे ,संदीप सावतडकर , रुपेश वाकचौरे, आनंद डीके .राहुल हंसवाल,आन्ना लोखंडे, आशिष राजपाल ,योगेश वानी , रोहीत पटेल , सोमनाथ आढाव ,अथर्व भोंगळे,कार्तिक सरदार ,निलेश सपकाळ , कुंदन भारंबे उपस्थित होते.
कोपरगाव तालुक्यातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्ष्यात घेता आ काळे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचे ठरवले असून कोणीही शुभेच्छा देण्यासाठी येऊ नये असे ही आव्हान आ काळे यांनी केले असताना त्यांचा वर प्रेम करणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विविध सामाजिक उपक्रम करून आ काळे चा वाढदिवस साजरा करत आहे.