Breaking News

नव्या जुन्याची सांगड घालत गौराई चे आगमन !

नव्या जुन्याची सांगड घालत गौराई चे आगमन.करंजी प्रतिनिधी-
    रविंद्र विसे यांच्या घरी गौरी गणपती चे स्वागत जुन्या व नव्या ची सांगड घालून करण्यात आले.
  वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्व उत्सव साध्या पध्दतीने साजरे करत आकर्षक सजावट करत घरगुती साजरे होत आहे यातच गौरी  गणपती चे आगमन अतिशय उत्साहाने झाले आहे.
    रविंद्र विसे यांच्या घरी  या वर्षी गौरींचे स्वागत जुन्या परंपरा सांभाळून नविन गोष्टींची सांगड घालून करण्यात आली आहे यात  सर्व प्रकारचे खाद्य पदर्था सोबत आजकालचे बच्चे कंपनी पासून ते मोठ्या पर्यंत आवडीचे असणाऱ्या कुरकुरे, चिप्स, चॉकलेट, केक या नव्या खाद्य पदार्थ वापरत आकर्षक सजावट करत  गौरी गणपती  ला  नैवेद्य  म्हणून नव्या व जुन्या ची सांगड घालत अनोखा उपक्रम यातून मांडण्यात आला त्यामुळे परिसरात  सर्वांनी त्यांच्या या प्रयोगाचं मना पासून कौतुक केलं