Breaking News

पारनेर ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समिती सदस्य पदी स्वप्नील घुले यांची निवड !

पारनेर ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समिती सदस्य पदी स्वप्नील घुले यांची निवड !
पारनेर प्रतिनिधी- 
पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या सभापती निर्देशीत रुग्णकल्याण समिती सदस्य पदी स्वप्निल घुले यांची निवड करण्यात आली आहे
ग्रामीण रुग्णालयांमध्ये स्थानिक सल्लागार समिती असते त्यामध्ये सभापती गणेश शेळके यांच्या शिफारशीनुसार ही नेमणूक करण्यात आली आहे समिती रुग्ण कल्याण समिती म्हणून कार्यरत असते रुग्णांसाठी सेवा उपलब्ध करून देणे त्यांना वेळोवेळी मदत करणे रुग्णालयातील सेवा प्रतीवर  नियंत्रण ठेवणे आदी बाबींवर या समितीचे नियंत्रण असते या समितीच्या माध्यमातून अनेक गरीब गरजू घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे असे निवडीनंतर स्वप्नील घुले यांनी सांगितले आहे.
या निवडीचे पत्र देताना पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके, सुखदेव पवार, संतोष सरोदे, राहुल पवार उपस्थित होते.