Breaking News

जामखेडच्या महेश बाबासाहेब गितेंची जिल्हाधिकारी पदाला गवसणी !

जामखेडच्या महेश बाबासाहेब गितेंची जिल्हाधिकारी पदाला गवसणी !
जामखेड प्रतिनिधी :
महेश बाबासाहेब गिते  या शेतकरयाच्या मुलाने UPSC परिक्षेत उत्तीर्ण होत जिल्हाधिकारी पदाला गवसणी घातली आहे.
 
संघ लोकसेवा आयोग (यूपीएससी)ने सिव्हिल सेवा परीक्षा 2019चा निकाल जाहीर केला आहे. सप्टेंबर, 2019मध्ये घेण्यात आलेल्या लेखी परीक्षा आणि फेब्रुवारी-ऑगस्ट, 2020 मध्ये घेण्यात आलेल्या इंटरव्ह्यूच्या आधारावर आयोगाने मेरिट लिस्ट जारी केली आहे. 
यामध्ये जामखेड तालुक्यातील मोहरी गावाचा सुपुत्र महेश बाबासाहेब गिते यांनी संपूर्ण देशातून 399 वी रँक मिळवत जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
जामखेड तालुक्याच्या सुपुत्राने समाज, राज्य आणि देशाच्या विकासात योगदान देण्याची संधी मिळवली आहे. 
निकालाची माहिती मिळताच जामखेड तालुक्यात सोशलमिडियासह  विविध स्तरातून महेश गिते यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.