Breaking News

पारनेर तालुक्यात दिवसभरात ४० अहवाल पॉझिटिव्ह, तालुक्यात एकूण कोरोना बाधित संख्या ५५० वर !

पारनेर तालुक्यात दिवसभरात ४० अहवाल पॉझिटिव्ह, तालुक्यात एकूण कोरोना बाधित संख्या ५५० वर !

आज दिवसभरात उच्चांकी ४० अहवाल पॉझिटिव्ह
कान्हूर पठार येथील एकाच कुटुंबातील सहा जणांना कोरोना ची लागण

 पारनेर शहरातील  महिला डॉक्टरचा अहवाल निगेटिव्ह तर मुलीचा अहवाल पॉजिटीव्ह !
 
पारनेर प्रतिनिधी - 
   पारनेर तालुक्यातील आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये 40 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.
    यामध्ये पारनेर शहर २ जवळा ६  राळेगण थेरपाळ १ निघोज २ गोरेगाव ३ कोहकडी १ हंगे ६ कान्हूर पठार ७ राळेगण सिद्धी ३ देवीभोयरे १ अळकुटी १ वघुंडे खु. २ सुपा २ गांजीभोयरे १, भाळवणी १ से एकूण ४० अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.
तर ८ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत यामध्ये पारनेर ३ निघोज १  कळस १ बुगेवाडी २ व वडझिरे १  या निगेटिव्ह अहवालात यांचा समावेश आहे.
तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे आज दिवसभरात प्राप्त झालेल्या अहवालात उच्चांकी 40 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत त्यामुळे तालुक्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या साडेपाचशे झाली आहे तालुक्यासाठी ही चिंतेची बाब आहे
ज्या गावातील ज्या भागात या पॉझिटिव व्यक्ती राहत होत्या तेथील १०० मीटर भाग हा कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत.