Breaking News

देवळाली प्रवरातील राजकीय पिता- पुञासह दोन महीला कोरोना बाधीत !

देवळाली प्रवरातील राजकीय पिता- पुञासह दोन महीला कोरोना बाधीत 
देवळाली प्रवरा प्रतिनिधी 
           देवळाली प्रवरा येथील एका वस्तीवरील राजकीय क्षेत्रातील पिता- पुत्रांसह त्याच कुटुंबातील दोन महीला गुरवारी सकाळी   कोरोनाची बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त  झाल्यावर  एकच खळबळ उडाली आहे.
              देवळाली प्रवरात व राहूरी फॅक्टरी परिसरात गेल्या १५ दिवसांपूर्वी कोरोनाचे एकूण १२ रूग्ण सापडले असता त्यातील ११ जणांवर उपचार करून घरी सोडण्यात आले. यातील पशु वैद्यकीय क्षेत्रातील एकावर अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात  उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यानंतर देवळाली प्रवरा व राहूरी फॅक्टरी परिसरात कोरोना रूग्ण सापडले नसल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला.
                    दरम्यान अनेक दिवसाच्या विश्रांती नंतर  देवळाली प्रवरा येथील एका वस्तीवरील राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या पिता- पुत्रांसह त्यां दोघांच्या  पत्नी कोरोना बाधीत  असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अण्णासाहेब मासाळ यांनी सांगितले.
            सदर कोरोना बाधित पिता-पुत्रांसह त्यांच्या घरातील दोन महीला  अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात बुधवार दि. ५ ऑगस्ट रोजी घशातील स्त्राव तपासणी केला असता गुरवार  दि. ६ ऑगस्ट रोजी राजकीय पिता- पुञ दोघेही कोरोना बाधित असल्याचा अहवाल गुरवारी सकाळी प्राप्त  झाला.तर दुपारी त्यांच्या घरातील दोन्ही महिलांचा अहवाल आल्यानंतर वैद्यकीय अधिकारी आण्णासाहेब मासाळ व मुख्याधिकारी अजित निकत यांनी सदर व्यक्तींच्या घराकडे धाव घेऊन त्यांना पुढील उपचारासाठी विवेकानंद नर्सिंग होम मधील कोविड सेंटर  येथे पाठविले आहे.