Breaking News

जातेगाव येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सुरु करण्याची मागणी !

जातेगाव येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सुरु करण्याची मागणी !


सुपा प्रतिनिधी :
      पारनेर तालुक्यातील जातेगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे उपकेंद्र सुरू करण्याची जातेगाव, घाणेगाव, गटेवाडी या  गावातील ग्रामस्थांनी  मागणी केली आहे. कोरोनाचे संकट दिवसेदिवस वाढत आहे. सर्व छोटे मोठे आजार झपाटयाने वाढत आहे. पळवे खु येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. परंतु ते  पुणे नगर राष्ट्रीय महामार्ग पार करून जावे लागते. सध्या महामार्गावरील होणारे अपघात पाहता नागरिक रस्ता क्रॉस करण्यास घाबरत आहे.  तरी शासनाने लवकरात लवकर जातेगाव घाणेगाव व गटेवाडी या तिन्ही  गावच्या मध्यभागी जातेगाव येथे प्राथमिक आरोग्य केद्राचे उपकेंद व्हावा अशी ग्रामस्थाकडून होत आहे.