Breaking News

गौरी गणपती निमित्त साकारला द्वारकामाई चा देखावा !

गौरी गणपती निमित्त साकारला द्वारकामाईचा देखावा !


करंजी प्रतिनिधी-
    सध्या सगळीकडे वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्ष्यात घेता सर्व धर्मियांचे सण देखील सध्या पद्धतीने साजरे होत आहे यातच कोपरगाव शहरातील अनिल शेलार यांनी त्यांचा घरी गौरी गणपती चा उत्सव साजरा करतांना श्रद्धा व सबुरीचे प्रतीक असलेल्या श्री साईबाबांच्या द्वारकामाई ची प्रतिकृती साकारली आहे.

    कोरोनाचा पार्श्वभूमीवर अनेक सण साधेपणाने साजरे होत आहे. मात्र साधेपणातही गौरी गणपती निमित्ताने अनेक कुटुंब आणि महिलावर्गात उत्साह जाणवतो आहे. कोपरगांव शहरात अनेक कुटुंबातील गौरी गणपती सणसाजरा होत आहे. कोपरगांव शहरातील जुणे गावठाण भागातील तेली गल्लीत शेलार कुटुंबातील सदस्यांनी गौरी गणपतीत श्री साईबाबांच्या व्दारकामाईची प्रतिकृती साकारली आहे. श्रध्दा आणि सबुरीचा संदेश देणारे सर्वधर्मसमभावचे प्रतिक असलेल्या साईबाबा नी वास्तव्य केलेल्या द्वारकामाई चा देखावा तयार केला आहे. त्यांचा या सुंदर देखाव्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.