Breaking News

करंजी मध्ये परत कोरोना चा प्रवेश, तालुक्यात एकूण २३ रुग्ण वाढ !

करंजी मध्ये परत कोरोना चा प्रवेश, तालुक्यात एकूण २३ रुग्ण वाढ !
करंजी प्रतिनिधी-
आज कोपरगाव तालुक्यातील कोविड सेंटर मध्ये १०९ संशयितांची रॅपिड टेस्ट द्वारे तपासणी केली असता त्यात २३ कोरोना रुग्ण आढळून आले तर ८६ अहवाल निगेटीव्ह आले असून आज नगर येथे पुढील तपासणीसाठी ८ अहवाल पाठवले आहे तर आज १३ कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी सोडण्यात आले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.
  यात करंजी-१, सुभाष नगर -२, सराफबाझर-१, टिळकनगर-६, शिवाजी रोड-२, राजपाल सोसायटी-२, बँक रोड-१, टाकली नाका-१, संजय नगर-१, बालाजी अंगण-४, श्रद्धा नगरी-२ असे एकूण २३ रुग्ण सापडले आहे.
     आज अखेर तालुक्यातील एकूण ५३२ कोरोना रुग्ण झाले आहे तर आज अखेर ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १६१ झाली आहे.