Breaking News

आमदार काळे च्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण !

आमदार काळे च्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण !
करंजी प्रतिनिधी-
     आज ४ ऑगस्ट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे युवा आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कारभारी पा आगवन यांच्या शुभहस्ते  करंजी गावात वृक्षारोपण करण्यात आले.
   या वेळी कर्मवीर शंकर काळे साखर कारखाना संचालक संजय आगवन, माजी संचालक चांगदेव आगवन, जेष्ठ मार्गदर्शक सांडू भाई पठाण, रयत पतसंस्थेचे चेअरमन मुकुंद आगवन, व्हाइस चेअरमन गोपाळ कुलकर्णी, बाबासाहेब कापसे, निवृत्ती आगवन, सुनील जाधव, नारायण आगवन, दत्तात्रय शिंदे, मच्छिन्द्र भिंगारे, एकनाथ फापाळें, नारायण आगवन, उत्तम गायकवाड, चांगदेव जाधव, इनामदार, संजय शिंदे, आप्पासाहेब आगवन, कैलास शिंदे, भाऊसाहेब आगवन, प्रसाद आगवन, अविनाश डोखे आदी उपस्थित होते.
    कोपरगाव तालुक्यातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्ष्यात घेता आ. काळे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचे ठरवले असून कोणीही शुभेच्छा देण्यासाठी येऊ नये असे ही आव्हान आ. काळे यांनी केले असताना त्यांचा वर प्रेम करणाऱ्या करंजी गावातील कार्यकर्त्यांनी वाढदिवसानिमित्त वृषारोपण केले.