Breaking News

कोरोनामुळे जामखेडला सार्वजनिक गणपती नाही जामखेडकरांचे अभिनंदन : पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह

कोरोनामुळे जामखेडला सार्वजनिक गणपती नाही जामखेडकरांचे अभिनंदन : पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह
जामखेड प्रतिनिधी :
           जामखेडला सार्वजनिक गणपती बसवले जाणार नाहीत . कोरोनाच्या अपत्तीजन्य परिस्थितीतीमुळे जामखेड करांनी घेतलेला निर्णय आदर्शवत आहे. जामखेडकरांच्या निर्णयाचे स्वागत व अभिनंदन करतो असे प्रतिपादन पोलिस अधिक्षक अखिलेशकुमार सिह यांनी केले. गणेशोत्सव व मोहरमच्या पार्श्वभूमीवर शहरातील महावीर भवनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलिस उपविभागीय अधिकारी संजय सातव, प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसिलदार विशाल नाईकवाडे, मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी, प्रा मधूकर राळेभात, सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले, संजय कोठारी, अँड अरुण जाधव, नगरसेवक शामीरभाई सय्यद, बापूसाहेब गायकवाड, मौलाना खलील, लहु शिंदे, विनायक राऊत, शंकर बोराटे, नासिर भाई गादिवाले, जावेद भाई सय्यद, अँड हर्षल डोके, जयसिंग उगले आदी उपस्थित होते.

---------- 
कोरोना काळात जामखेडला दर शनिवारी जनता कर्फ्यू लागु आहे मात्र गणपती मुर्ती विक्री करणारे दूकानांना शोसलडिस्टन्सिंगचे नियमानुसार मुर्ती विक्री करण्याचे परवानगी दिली आहे. इतर दुकानांना नाही असे मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते यांनी सांगितले. 

-----------
कोरोनाच्या अपत्तीजन्य परिस्थितीतीमुळे आपल्या धार्मिक भावना व आनंदाचा त्याग करत कोरोना आजार पसरू नये म्हणून सार्वजनिक गणपती न बसवण्याचा निर्णय घेतला.ही सर्व गणेश मंडळे कोरोना योध्दयांची भुमिका बजावत आहेत असे नगरसेवक शामीरभाई सय्यद यांनी मत व्यक्त केले.  कोरोनाच्या भयावह काळात गणपती उत्सव होत आहे नागरिकांचे आरोग्य चांगले. आजारापासून सर्वांचे रक्षण व्हावे म्हणून सर्वांनीच प्रशासनाचे नियम अटींचे पालन करण्याचे आवाहन प्रा मधूकर राळेभात यांनी केले. यावेळी प्रांताधिकारी अर्चना नष्टे पोलिस उपाधिक्षक सागर पाटील पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी मार्गदर्शन केले.