Breaking News

कोविड १९ची टेस्ट होणार अकोले तालुक्यातच, सात ठिकाणी टेस्टची व्यवस्था.

कोविड १९ची टेस्ट होणार अकोले तालुक्यातच, सात ठिकाणी टेस्टची व्यवस्था.


अकोले-
अकोले  तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र देवठाण,समशेरपुर, म्हाळादेवी,अकोले (खानापुर),राजुर ,कोतुळ,ब्राम्हणवाडा या ठिकाणी कोरोना टेस्टची सुविधा सुरु केली गेली आहे.शक्यतो ज्या व्यक्तींचा संपर्क न कळत कोरोना पाॅजीटीव्ह असलेल्या व्यक्तीशी आला आहे.अशा व्यक्ती किंवा ज्या व्यक्तीस कोविड-१९ची लक्षणे दिसत किंवा जाणवत असतील त्यांनी गर्दी न करत टेस्ट करावी.तसेच गरोदर महीलासांठी ही टेस्ट महत्वाची असणार आहे.
     आपल्या जवळपासच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ही सुविधा उपल्बध आहे.आपण सर्वांनी योग्य वेळी योग्य काळजी घेऊन कोरोना या महामारीला हरवु या.शासनाच्या सुविधेला प्रतिसाद देऊ या अन समाज्याच्या आरोग्याची काळजी घेऊ या.कोरोनाची लागण झाल्यानंतर योग्य काळजी घेतली तर नक्कीच कोरोना बरा होतो.माञ सर्वसामन्य माणुस हा भीतीमुळे गर्भगळीत होऊन जातो.भिती न बाळगता आपण सर्वांनी सदर कोरोना पाॅजीटीव व्यक्तींचे मनोबल वाढवले पाहिजे. त्यांना धिर दिला पाहिजे.कुटुंबातील सदस्य यांनी घरातील वयस्कर व्यक्ती, लहान मुले,गरोदर महिला यांची विशेषतः काळजी घेतली पाहिजे अन घरातुन बाहेर पडल्यानंतर मास्कचा वापर करावा.असे आपणास मी आमदार डाॅ किरण लहामटे अवाहन करत आहे.