Breaking News

पारनेर तालुक्यात दिवसभरात १३ कोरोना बाधित, शहरामधील विद्यालयातील शिक्षकासह आईचा अहवाल पॉझिटिव्ह !

पारनेर तालुक्यात दिवसभरात १३ कोरोना बाधित, शहरामधील विद्यालयातील शिक्षकासह आईचा अहवाल पॉझिटिव्ह !
 ------ 
तहसिल कार्यालयातील एका अधिकाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह
--------
सुपा तलाठी कार्यालयातील कर्मचारी कोरोना बाधित
--------
तहसिल कार्यालय दोन दिवस बंद १०० मीटर परिसर १४ दिवस बंद तहसीलदार ज्योती देवरे यांचे आदेश
पारनेर प्रतिनिधी - 
      पारनेर तालुक्यांमध्ये दि ७ रोजी घेतलेल्या रॅपिड चाचणी अहवाल तसेच खाजगी व शासकीय लॅब च्या अहवालानुसार १३ व्यक्तींना कोरोना ची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.
      आज रात्री आठ वाजे पर्यंत प्राप्त झालेले तालुक्यातील अहवाल पारनेर शहर ४, मावळेवाडी २, पिंपळगाव तुर्क २, कान्हूर पठार २ सुपा २ पिंपळगाव रोठा १ या गावातील व्यक्तींचा पॉझिटिव अहवालात समावेश आहे. यामध्ये पारनेर शहरामध्ये एका विद्यालयातील शिक्षक व त्याच्या आईचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
तर पारनेर तहसिल कार्यालयातील एका अधिकार्याचा अहवाल पॉझिटिव प्राप्त झाला आहे तसेच सुपा तलाठी कार्यालयातील कर्मचारी कोरोना बाधित झााला 
आहे. 
       दरम्यान पारनेर तहसिल कार्यालयातील अधिकार्याचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्यानंतर तहसिल येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांची रॅपिड किट च्या माध्यमातून चाचणी करण्यात आली ते अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत
खबरदारी म्हणून तहसीलदार ज्योती देवरे यांनी तहसिल कार्यालय दोन दिवसांसाठी बंद करण्याचे तसेच कार्यालय बाहेरील दुकाने व १०० मीटर चा परिसर १४ दिवस कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे व हा सर्व परिसर १४ दिवस बंद ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.