Breaking News

बंदी झुगारत भंडारदरा धरणाकडे पर्यटकांचा लोंढा !

बंदी झुगारत भंडारदरा धरणाकडे पर्यटकांचा लोंढा ! अकोले प्रतिनिधी :
      कोरोनाला महामारीमुळे  सर्वत्र पर्यटनाला बंदी असतानाही   शनिवार- रविवारी सलग दोन दिवस सुट्ट्या आल्याने   आज पर्यटकांनी भांडरदरा धारणाकडे  मोठी गर्दी केली होतो   पर्यटकांच्या गर्दी मूळे धरण परिसरात सामाजिक डिस्टंट चा फज्जा उडाला.
 आज दिवसभरात परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी  असतानाही प्रशासनाने  त्याकडे दुर्लक्ष केले सध्या  कोरोना या महामारीचे संकट सर्वत्र असल्याने  सरकारने महाराष्ट्रातील सर्व पर्यटन स्थळे बंद केली आहेत असे असताना देखील भंडारदरा परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे पर्यटनातुन आदिवासींना रोजगार उपलब्ध होतो मात्र सध्या किरोना भीतीमुळे  या रोजगारावर कुऱ्हाड कोसळली आहे  अनेक दिवसांपासून  पर्यटकांनी धरणाकडे पाठ फिरवली होती मात्र  गेल्या 10 ते 12 दिवसापासून पाऊस सुरू आहे  16 ऑगस्ट रोजी  भंडारदरा धरण  भरले आहे  धरणातून विसर्ग सुरू आहे ,निसर्गाचा  आनंद घेण्यासाठी  पर्यटक  शासनाचे  बंदी आदेश झुगारून पर्यटनाला येत आहे यामुळे  आज रविवारी गर्दीने  यावर्षीचा उच्चांक गाठला होता.
 दरम्यान बाहेरील  पर्यटकांमुळे स्थानिकामध्ये कोरोनाचा फैलाव  होऊ शकतो अशी भीती  भंडारदरा गावचे सरपंच पांडुरंग खाडे यांनी व्यक्त केली असून   त्यांनी  प्रशासनाला  व  पाटबंधारे विभागाला निवेदन दिले आहे.
--------------