Breaking News

धक्कादायक : जामखेड मध्ये कोरोनाने घेतला सातवा बळी !

धक्कादायक : जामखेड मध्ये कोरोनाने घेतला सातवा बळी !
जामखेड प्रतिनिधी :
शहरातील सदाफुले वस्ती येथील तीन दिवसापुर्वी कोरोना बाधित आढळलेल्या व्यक्तीचे अहमदनगर येथे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले आहे.  नागरिकांमधून भीतीदायक हळहळ व्यक्त होत आहे.
मयत दशरथ शिरोळे (वय ५५) यांचा मुंबई येथे राहणारा मुलगा कोरोना पाँझिटीव्ह आले होता.दि २८ जूलै रोजी मुंबई येथुन आपल्या मुलाला भेटुन आले होते. त्यानंतर २ आँगस्ट रोजी मुगगाव ता पाटोदा येथे नातेवाईकांच्या लग्नाला जाऊन आले होते. दि ३ आँगस्ट रोजी त्रास होऊ लागल्याने दवाखान्यात गेले असता लक्षण पाहुन डॉक्टरांनी  कोरोनाची तपासणी केली असता दशरथ शिरोळे पाँझिटीव्ह आढळून आले. जास्त त्रास होऊ लागल्याने दशरथ शिरोळे यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे उपचार चालू असताना दि ५ आँगस्ट रोजी रात्री त्यांचे निधन झाले. जामखेडमधील सातवा कोरोना बळी असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. असे वैद्यकीय अधिक्षक डॉ यूवराज खराडे यांनी सांगितले.