Breaking News

विलासराव देशमुख महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृत नेतृत्व होते. - प्राचार्य यादव

विलासराव देशमुख महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृत नेतृत्व होते. - प्राचार्य यादव 
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी :
     विलासराव देशमुख हे भारतीय व महाराष्ट्राच्या राजकारणातील दूरदर्शी व सुसंस्कृत असे नेतृत्व होते.  त्यांच्यासारख्या नेत्यांची आज उद्भभलेल्या परिस्थितीत उणीव भासते  असे प्रतिपादन के . जे . सोमैया  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.  बी एस .यादव यांनी केले.
             स्थानिक के . जे . सोमैया महाविद्यालयात त्यांच्या आठव्या  पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते.प्राचार्य डॉ. बी . एस . यादव पुढे म्हणाले की  कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष  अशोकराव रोहमारे यांचे वर्गमित्र असल्याने ते अनेकदा महाविद्यालयात आले व महाविद्यालयाच्या अनेक इमारतींचे उद्घाटन त्यांच्या शुभहस्ते झाल्यामुळे त्यांच्या आठवणी आम्हा सर्व सेवक व व्यवस्थापन मंडळ यांच्या मनात आजही ताज्या आहेत.
    बाभळगाव ( जि-लातूर) सारख्या अत्यंत छोट्या खेड्यात जन्मूनही त्यांनी त्या काळात बी.एस्सी, बी.ए/ एल.एलबी सारख्या पदव्या प्राप्त केल्या व १९७४ ला प्रथम ते गावचे सरपंच व नंतर १९८० ला आमदार झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या राजकीय जीवनात मागे वळून कधीच  बघितले नाही. दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद, केंद्रात व राज्यात विविध खात्यांची मंत्रिपदे सांभाळत असताना त्यांनी आपली जनकल्याणाची जाणीव सातत्याने जागृत ठेवून अनेक लोककल्याणकारी कामे केली,  त्यांच्या स्मृतीस व्यवस्थापन मंडळ, संस्थेचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे  सर्व प्राध्यापक व सेवक यांच्या वतीने विनम्र अभिवादन केले.
           याप्रसंगी बोलताना प्रा. डॉ. गणेश देशमुख म्हणाले की , आज राज्यामध्ये काँग्रेस सत्तेत सहभागी आहे . कोविडच्या   आजारामुळे संपूर्ण जनता त्रस्त आहे अशावेळी व काँग्रेसच्या आजच्या स्थितीमध्ये त्यांच्यासारख्या अष्टपैलू, सभ्य व कर्तुत्ववान नेत्त्याची  उणीव विशेष जाणवते. कार्यक्रमास प्रा.  डॉ.  विलास आवारी , डॉ.  के. एल  गिरमकर ,  डॉ. पगारे एस. आर, डॉ. बनसोडे एस. के, डॉ. अभिजीत नाईकवाडे महाविद्यालयातील निवडक प्राध्यापक व सेवक उपस्थित होते.