Breaking News

जिल्हा मराठा संस्थेने कोरोना विरोधी लढाईमध्ये स्वतःला झोकून दिलेले आहे- माजी आमदार नंदकुमार झावरे

      जिल्हा मराठा संस्थेने कोरोना विरोधी लढाईमध्ये स्वतःला झोकून दिलेले आहे- माजी आमदार नंदकुमार झावरे
पारनेर प्रतिनिधी -
      नगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक  संस्थेच्या वतीने महिलांसाठी नगर जिल्ह्यातील पहिले कोविड केअर सेंटरचे लोकार्पण संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार नंदकुमार झावरे, सचिव जी डी खानदेशे याच्या पुढाकारातुन पारनेर येथील राजमाता जिजाऊ वसतिगृह येथे १२० बेड ऑक्सिजन व सर्व सुविधा युक्त तयार करून दिले आहे. पारनेर येथे १२० बेड चे पाहिले महिला कोविड केअर सेंटरचे लोकार्पण दि ६ ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. 
    यावेळी माजी आमदार नंदकुमार झावरे सचिव खानदेशे, तहसीलदार ज्योती देवरे, गटविकास अधिकारी किशोर माने, आरोग्य अधिकारी डॉ प्रकाश लाळगे, प्राचार्य रंगनाथ आहेर, डॉ. उदरे आदी उपस्थित होते.
         मालेगाव पॅटर्नप्रमाणे डॉ. कापडणीस यांच्या म्युझिकल योगाचे या ठिकाणी रुग्णांना नियमित प्रशिक्षक राजेश्वरी कोठावळे यांच्या माध्यमातून योगा करून घेतला जातो येथे आज १८ कोरोना बाधित महिला उपचार घेत आहेत.
       यावेळी बोलताना माजी आमदार नंदकुमार झावरे म्हणाले ज्या दिवसापासून लॉकडाऊन जाहीर झाले तेव्हापासून जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेने स्वतःला या लढाईमध्ये झोकून दिलेले आहे. पहिली संस्था आहे तिने  ५१ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये केली आहे. यातून आम्ही सामाजिक बांधिलकी जपत आहे. शंभर वर्ष जुनी अशी ही संस्था आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधा व गुणवत्तेसाठी आम्ही सहभाग घेतला तसेच या संकट काळामध्ये देखील आम्ही शासनाबरोबर समाजाबरोबर आहोत. पारनेर तालुक्यातील संस्थेचे सर्व हायस्कूल ज्युनिअर कॉलेज हे तहसीलदार ज्योती देवरे यांच्या ताब्यात दिलेले आहेत सुरुवातीला त्यांचा उपयोग निवारा सेंटर म्हणून करण्यात आला आहे. संस्थेला समाजसेवेची संधी मिळाली असे माजी आमदार झावरे म्हणाले.
       तहसीलदार देवरे यांनी बोलताना सांगितले कि कोरोना विरोधात लढाईमध्ये आपल्याला त्यावर मात करायची असेल तर माजी आमदार नंदकुमार झावरे यांच्यासारखे व्यक्तिमत्व गरजेचे आहे. त्यांनी ही सेवा तालुक्यातील लोकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे त्यांचे प्रशासनाच्या वतीने धन्यवाद मानले.

        जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेने कोरोना काळातील या लढाईत स्वतःला झोकून दिलेले आहे तालुक्यात काही कोविड सेंटर झाले आहेत परंतु तेथे  महिलांची कुचंबणा होत होती सुरक्षितेचा प्रश्न त्या ठिकाणी होता म्हणून पहिले महिला कोविड सेंटर हा कोरोना काळामध्ये संकटसमयी नवा उपक्रम आहे तहसीलदार ज्योती देवरे या खूप चांगले काम तालुक्यात करत आहेत आम्ही या संकटकाळात शासनाबरोबर प्रशासनाबरोबरच आहोत.
-----------
नंदकुमार झावरे(माजी आमदार)