Breaking News

मुळा धरण भरायला राहिले दीड फूट, उद्या मुळा नदीत कोणत्याही क्षणी सोडणार ओव्हरफलो चे पाणी !

मुळा धरण भरायला राहिले दीड फूट, उद्या मुळा नदीत कोणत्याही क्षणी सोडणार ओव्हरफलो चे पाणी !


 राहुरी शहर प्रतिनिधी :
मुळा धरण काठोकाठ भरायला आता हवे फक्त दीडफुट पाणी पातळी आवश्यक असुन धरणातून सोमवारी केव्हा ही मुळा नदी पात्रात पाणी झेपावणार् असल्याने यांकडे सर्वाचे लक्ष लागले आहे दरम्यान रविवारी धरण परिसर हौशी प्रायोजकांच्या गर्दीने फुलाला होता.
२६ हजार दशलक्ष घनफूट क्षमतेच्या मुळा धरण ऑगस्टमध्ये मुळा ओहरफोलो होण्याचा प्रसंग कमी वेळा आलेले आहे या आठवड्यात पावसाच्या पुर्णर आगमनाने ऑगस्ट अखेर धरणातून धरणातून मुळा नदीत पाणी झेपावणार् आहे अलिकडच्या काळात घाटमाथ्या पेक्षा धरणा जवळील क्षेत्रात चागंला पाऊस झाल्याने व नंतर पाणलोट क्षेत्रातील पावसाची भर पडली.


रविवारी सकाळी धरणाकडे ४२२दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झालीय धरणाचा पाणीसाठा २४हजार ८४० दशलक्ष घनफूट म्हणजे ९६टक्के इतका झाला आहे.
    कोतुळ कडील मुळा नदीतून ५३२७ क्युसेक्सने पाण्याची आवक सुरु होती ती दुपारनंतर कमी झाली मुळा धरण वर पावसाची विश्रांती असली तरी आतापर्यंत एकुण विक्रमी ७१६ मिलिमीटर पाऊस झाला आहे तुलनेने कोतुळ येथें ४८७ मिलिमीटर पाऊस झाला आहे दुपारी पाणी पातळी १८१०.२०फुटांवर गेली असल्याने धरणं भरायला अवघे दीड फुट पाणी राहिली आहे.