Breaking News

बार्टीच्यावतीने साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना अनोखी आदरांजली !

बार्टीच्यावतीने साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना अनोखी आदरांजली ... 
ऑनलाइन व्याख्यान घेऊन साहित्यरत्नाला अभिवादन !
नेवासा तालुका प्रतिनिधी :
जग बदल घालुनी घाव, 
सांगून गेले मला भीमराव 
        असा संदेश देणारे आणि फकीरा ही अत्यंत नावाजलेली कादंबरी बाबासाहेबांच्या झुंजार लेखणीला अर्पण करणारे साहित्यातील बादशहा, साहित्याचे सम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची शंभरावी जयंती आज डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी 
पुणे  यांच्यावतीने अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आले.
कोरोना साथीच्या या परिस्थितीतही महामानवांना   अभिवादन करण्याची बार्टीची परंपरा अखंडित ठेवीत शिरुर तालुका समता दूत रेश्मा साळवे यांनी  ऑनलाइन व्याख्यानाचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडून शोषितांच्या आवाजाला क्रांतीची फुंकर मारणाऱ्या अण्णाभाऊ साठेंची जयंती निमित्त प्रबोधनात्मक जनजागृती कार्यक्रम मोठ्या  दिमाखात पार पाडला. 
       यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख व्याखाते सि.टी. बोरा महाविद्यालयाचे प्राध्यापक डि.के.  मांडलीक यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे जीवन व कार्य या विषयी माहिती दिली. त्याचप्रमाणे समाजाचा विकास होण्यासाठी एकता आवश्यक आहे हे अधोरेखित केले. व्याख्यानातून महामानवांना अभिवादन करण्याची संकल्पना ही कौतुकास्पद आहे हे यावेळी व्याखात्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमास बार्टीचे अधिकारी  दिलावर सय्यद सर, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास प्रतिष्ठान जुन्नरचे अध्यक्ष काशीनिथ आल्हाट उपसाथित होते.
  कार्यक्रम बार्टीचे महासंचालक कैलास कणसे सर, समतादूत प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे मॅडम, पुणे जिल्हा प्रकल्प अधिकारी शितल बंडगर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.