Breaking News

अकोल्यात करोना बाधितांनी द्विशतक ओलांडले, कोरोना मृतांची संख्या झाली चार !

अकोल्यात करोना बाधितांनी  द्विशतक ओलांडले, कोरोना मृतांची संख्या झाली चार !
अकोले  /प्रतिनिधी :
       अकोले तालुक्यात आज शनिवारी सकाळी खानापुर येथील कोविड सेंटरमध्ये ६४ व्यक्तीच्या रॅपिड ॲन्टीजन टेस्ट घेण्यात आली या  मध्ये देवठाण व म्हाळादेवी येथे प्रत्येकी दोन मिळून चार रुग्ण कोरोना बाधित आढळल्यानंतर सायंकाळी खाजगी प्रयोगशाळेत पाच व्यक्तीचा अहवाल कोरोना पॅाझिटीव्ह आला आहे.यामध्ये शहरातील अगस्ती कारखाना रोडला एक ३० वर्षीय तरुण, अकोले शहरालगत नविन नवलेवाडीतील कॅालणीत ७३ वर्षीय वृद्ध, कोतुळ येथील ३८ वर्षीय पुरूष, २२ वर्षीय तरुण व राजुर येथील ३१ वर्षीय शिक्षक असलेल्या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.
        अकोले तालुक्यात  काल १९ रुग्ण बाधित आढळल्यानंतर आज शनिवारी ९ व्यक्तीचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला.
तालुक्यातील एकुण रुग्ण संख्या २०५ झाली आहे. त्यापैकी १५२ व्यक्ती करोनामुक्त झाले काल मोग्रस येथील एका करोना बाधित रुग्णाचा नाशिक येथे उपचार चालू असताना मृत्यू झाल्याने तालुक्यात करोना मृतांची संख्या ४ झाली  असून ४९ व्यक्ती वर उपचार सुरू आहे.
---