Breaking News

हुश्श... नेवासा तालुक्यात शनिवारी पुन्हा नवे २१ रुग्ण सापडले तर ०४ जण कोरोनामुक्त !

हुश्श... नेवासा तालुक्यात शनिवारी पुन्हा नवे २१ रुग्ण सापडले तर ०४ जण कोरोनामुक्त !


नेवासा तालुका प्रतिनिधी :
       नेवासा तालूक्यात कोरोना या संसर्ग आजाराचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. रुग्ण संख्या दिवसागणिक वाढत चालल्याने कोरोनाच्या धास्तीने नेवासकरांची मोठी पाचावरधारण बसली आहे. शनिवार (दि.२२) रोजी तालूका अरोग्य अधिकारी डॉ अभिराज सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहीतीमध्ये शनिवारी २२ रुग्णांची वाढ झाली आहे तर ४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
      तालूक्यात दिवसागणिक कोरोना रुग्णांची मोठी वाढ झालेली असून कोरोना नेवासकरांचा पिच्छाच सोडायला तयार नसल्याचे दिलेल्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. तालूका आरोग्य विभागाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु असतांना कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जनतेने मोठी सतर्कता पाळणे गरजेचे असल्याचे मतही आरोग्य विभागाच्या सुञांनी यावेळी बोलतांना सांगितले 
     तालूक्यात एकूण कोरोनाबाधीत रुग्णांचा आकडा ५९२ झालेला आसून त्यापैकी ४५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर १२६ रुग्ण उपचार घेत आहेत. १४ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. शनिवारी नव्या रुग्णांमध्ये कुकाणा ०७, नेवासा बुद्रूक ०६, मुकिंदपूर ०२, सोनई ०१, भेंडा खुर्द ०१, पाथरवाला ०१, खडका ०१, पिंप्रीशहाली ०१ तर  नेवासा खुर्द येथील एका रुग्णाची वाढ झाल्याने नेवासकरांची धाकधूक वाढली आहे.