Breaking News

भातोडी, पारगाव, पारेवाङी तलाव पूर्ण क्षमतेने भरला..!

भातोडी पारगाव पारेवाङी  तलाव पूर्ण क्षमतेने भरला..!
--------------
तीन ते चार वर्षानंतर तलाव भरल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान
अहमदनगर/प्रतिनिधी - 
       नगर तालुक्यातील,भातोडी पारगाव पारेवाङी  तलाव पूर्ण क्षमतेने भरला, मागील तीन ते चार वर्षापासून सतत दुष्काळी परिस्थितीमुळे हा तलाव तब्बल तीन ते चार वर्षांनी पूर्ण क्षमतेने कधीच भरला आहे.
  हा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे परिसरातील भातोडी ,दशमी गव्हाण, चिचोंडी पाटील, सांडवा ,आठवण ,आदींसह परिसरातील गावांना याचा फायदा होणार असल्याने पाणीटंचाई दुर होणार आहे.
              या वर्षी समाधान कारक पाऊस पडल्याने व तलाव भरल्याने, सर्व पंचक्रोशीत शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे,पूर्ण क्षमतेने भरलेल्या या तलावाच्या पाण्याचे जलपूजन पारेवाडी गावचे सरपंच राहुल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना राहुल शिंदे म्हणाले की हा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे परिसरातील टंचाई दूर होणार असून शेतकऱ्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बाब आहे, त्याचबरोबर प्रत्येक नागरिकाने पाण्याचा अपव्यय टाळा पाणी नियोजनबद्ध वापर केल्यास पुढील काळातील पाणीटंचाई नक्कीच दूर करता येईल असे मत व्यक्त केले यावेळी ग्रा.प सदस्य,श्री गणेश शिंदे, युवा नेते निलेश शिंदे,अतुल शिंदे  विकास(आबा)गुंड,पारगावचे उपसरपंच श्री सुरेश भोसले, हमीद शेख बाळासाहेब चव्हाण, हे या प्रसंगी उपस्थित होते.