Breaking News

सर्व्हरमध्ये अडकला सात बारा ,ऑनलाईन कामे रखडली जिल्ह्यातील परिस्थिती !

सर्व्हरमध्ये अडकला सात बारा ,ऑनलाईन कामे रखडली जिल्ह्यातील परिस्थिती !
श्रीगोंदा/तालुका प्रतिनिधी : 
       सध्या ऑनलाईन सात बारा उतारे मिळण्यासाठी शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात परिणामी तलाठी ,मंडलाधिकारी व शेतकरी यांच्यात वेळेत ऑनलाईन कामे होत नसल्यामुळे वादावादी होत असल्याचे चित्र दिसून येते पण ऑनलाईन कामासाठी असणारे सर्व्हर च व्यवस्थित चालत नसल्यामुळे कामे रखडत असल्याचे समजते . शासनाने सात बारा ,ई फेरफार ,सर्टिफाईड नोंदी आदी कामे ऑनलाईन सुरु केली आहेत पण गेल्या आठवडा भरापासून सर्व्हरला गती नसल्यामुळे शेतकऱ्यांची कामे रखडली आहेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन च्या काळात अनेक तलाठी मंडलाधिकारी स्थरावर कामे रखडली आहेत त्यातच भर म्हणून पीककर्जासाठी नोंदल्या जाणाऱ्या ई कराराची ऑनलाईन अंमल होत नाही बँक बोजा ,बक्षिसपत्र नोंद ,हक्क सोड पत्र नोंद खरेदी च्या नोंदी प्रलंबित आहेत त्यामुळे अनेक शेतकरी व तलाठी मंडलाधिकारी यांच्यात वादावादी होण्याचे प्रकार वाढले आहेत त्याच बरोबर ऑनलाईन कामे रखडल्यामुळे    वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या रोषास हि तलाठी मंडलाधिकारी यांना सामना करावा लागत आहे पण मूलतः सर्व्हर अतिशय कमी वेगाने चालत असल्यामुळे कामे रखडली आहेत                                                                                                                                                                                                                                                                                              सर्व्हर ला गती नसल्यामुळे कामे रखडतात -संतोष तनपुरे नाशिक विभाग तलाठी संघटना सरचिटणीस सध्या ऑनलाईन कामासाठी सर्व्हरच व्यवस्थित चालत नाही त्यामुळे ऑनलाईन कामे रखडत आहेत पण वरिष्ठ अधिकरी हे बैठकीत तलाठी मंडलाधिकारी यांना जाब विचारतात त्यामुळे सध्या तलाठी मंडळ अधिकारी हे तणावाखाली काम करत असल्याचे दिसून येते अशी प्रतिक्रिया तलाठी संघटनेचे नाशिक विभागाचे सरचिटणीस संतोष तनपुरे यांनी दिली