Breaking News

महिलांना शासकीय कमिट्यांमध्ये ५० टक्के जागा द्या : सौ शिल्पाताई दुसंगे

महिलांना शासकीय कमिट्यांमध्ये ५० टक्के जागा द्या : सौ शिल्पाताई दुसंगे 
नेवासा तालुका प्रतिनिधी :
महिलांना स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद व  शासकिय कमिट्यांसह महामंडळ या इतर ठिकाणी ५० टक्के जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी इंदिरा कॉंग्रेसच्या महिला प्रदेश सदस्या सौ शिल्पाताई दुसंगे यांनी नुकतीच राज्याचे महसूलमंञी बाळासाहेब थोरात यांची भेट घेवून महिला विविध कमिट्यांमध्ये संधी देण्याची मागणी केली.
 जिल्हा दौऱ्यावर आलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदन देऊन सौ दुसूंगे यांनी ही मागणी केली.
  प्रत्येक वेळी महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतांना महिलांना कुठेतरी दुजाभाव केला जात असल्याचे यावेळी दुसूंगे यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निदर्शनास आणून दिले यापुढील काळामध्ये महिलांना योग्य न्याय मिळावा तसेच महामंडळ व इतर शासकीय कमिटीवर ५० टक्के जागा मिळाव्यात या मागणीसाठी त्यांनी आज मंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदन देऊन मागणी केली.
   महिला नारी चुल आणि मुल संभाळून देशाची राष्ट्रपती बनलेली आहे.महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लागून कर्तव्य बजावत आसतांना महिला संधी उपलब्ध करुन देण्याची मागणीही यावेळी इंदिरा कॉंग्रेसच्या महिला प्रदेश सदस्या सौ शिल्पाताई दुसूंगे यांनी महसूलमंञी थोरात यांच्याकडे यावेळी केली.