Breaking News

अहमदनगर जिल्हात आज दुपार पर्यंत नव्या २२९ बाधितांची रुग्णसंख्येत भर !

अहमदनगर जिल्हात आज दुपार पर्यंत नव्या २२९ बाधितांची रुग्णसंख्येत भर !
------------- 
आज ४८४ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज
-----------
जिल्ह्यात पंधरा हजाराहून अधिक रुग्ण बरे
-----------
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.२८ टक्के
--------
नव्या २२९ बाधितांची रुग्णसंख्येत भर


अहमदनगर : 
     जिल्ह्यात आज ४८४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १५ हजार १५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८० टक्क्यांहून अधिक असून ते आता ८२.२८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २२९ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २९७३ इतकी झाली आहे.

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १४१,संगमनेर १९, राहाता ०१, पाथर्डी ०४, नगर ग्रामीण ३१, कॅंटोन्मेंट ०५, नेवासा ०३, पारनेर १२, अकोले ०३, राहुरी ११, कोपरगाव ०३, जामखेड ०२ आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ४८४ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा १६८, संगमनेर २२, राहाता २५, पाथर्डी १२, नगर ग्रा.६५, श्रीरामपूर ३२, कॅन्टोन्मेंट १०, नेवासा ११, श्रीगोंदा १८, पारनेर १७, अकोले १३, राहुरी ०८, 
शेवगाव ०७, कोपरगाव २४, जामखेड ३४, कर्जत १६  मिलिटरी हॉस्पीटल ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या: १५०१५

उपचार सुरू असलेले रूग्ण:२९७३

मृत्यू: २६०

एकूण रूग्ण संख्या:१८२४८