Breaking News

पी. एम. किसान योजनेला शासकीय उदासिनतेचे कोपरगाव तालुक्यात ग्रहन : महेंद्र रोहमारे यांचा आरोप

पी. एम. किसान योजनेला शासकीय उदासिनतेचे कोपरगाव तालुक्यात ग्रहन : महेंद्र रोहमारे यांचा आरोपकोपरगाव / तालुका प्रतिनिधी :
पंतप्रधान किसान योजना राबविण्यात येत असताना केवळ शासकीय तलाठी यांच्याकडून सहकार्य होत नसल्याने कोपरगाव तालुक्यात असलेल्या शेतकरी लोकांना या लाभा पासून वंचित राहावे लागत असल्याची तक्रार पोहेगाव येथील शेतकरी महेंद्र अविनाश रोहमारे यांनी जिल्हाधिकारी व नाशिक आयुक्त यांच्या कडे केलेल्या तक्रारीत केली आहे.
       पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी हितासाठी सुरू केलेल्या योजनेला अडथळा निर्माण करत असलेल्या पोहेगाव येथील तलाठी यांच्यावर कारवाई करावी अशी लेखी मागणी केली असुन थेट तशी तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडे केली असल्याचे सांगितले महेंद्र रोहमारे यांनी सांगितले की पोहेगाव येथील गावात माझी वडलो पार्जित जमीन असुन शासकीय पी एम किसान योजनेमुळे प्रति महिना दोन हजार रुपये अनेकांना मिळत आहे राहता तालुक्यातील अनेक गावांत विशेष अभियान राबविण्यात आले त्यामुळे कोट्यवधी रुपये लोकांना मिळाले मात्र कोपरगाव तालुक्यात  यासाठी ज्या प्रमाणात जनजागृती होणे गरजेचे होते तसे झाले नाही  तर यासाठी   ८अ  बँक पासबुक आधार कार्ड आदी कागदपत्रे देखील दिली त्याची पोहच मागितली असता दिली नाही जवळपास सहा महिने उलटून गेले तरी लाभ का मिळत नाही यांचे उत्तर हे तलाठी देत नसल्याने   माझ्या सारख्या अनेक पात्र लाभार्थी यांना शासकीय उदासीन धोरणामुळे या चांगल्या पद्धतीने हि योजना राबविण्यात न आल्याने माझ्या सारख्या गरिब शेतकऱ्यांला या पासून वंचित राहावे लागत आहे हि योजना राबविताना जर शासकीय लोकसेवक जर उदासीन असतील तर याचा लाभ कसा मिळेल असा प्रश्र्न निर्माण झाला आहे   पात्र लाभार्थी व वंचित लाभार्थी यांच्याकडे लोकप्रतिनिधी लक्ष देण्याची गरज असुन शासकीय अधिकारी जर जुमानत नसतील तर अशा  लोकसेवकाची चौकशी झाली पाहिजे यासाठी आपण शेवटपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे  विविध शासकीय अधिकारी यांना पाठवलेल्या निवेदनात महेंद्र रोहमारे यांनी सांगितले आहे