Breaking News

कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्षपद राहुल गांधींनी स्वीकारावं ही कार्यकर्त्यांची प्रबळ इच्छा !


Rahul gandhi forgot to congratulate ashok chavan for victory in ...

मुंबई :  राहुल गांधी यांनी काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारवं म्हणून आता देशभरातील नेते आणि कार्यकर्ते राहुल गांधी यांना आवाहन करत आहेत. राज्यातील काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यानंतर आता अशोक चव्हाण यांनी देखील राहुल गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारावं म्हणून निवेदन दिलं आहे.

अशोक चव्हाण यांनी निवेदनात म्हटलं की, 'भारताची एकता, अखंडता तसेच प्रगतीमध्ये नेहरू-गांधी कुटुंबानी दिलेले योगदान अपूर्व आहे. देश व काँग्रेस पक्ष संघटीत ठेवण्यासाठी पुढील काळातही त्यांच्या सक्रिय नेतृत्वाची नितांत गरज आहे. पक्षाला एकजीव ठेवण्याची, बांधून ठेवण्याची क्षमता केवळ गांधी कुटुंबाकडे आहे आणि इतिहासातही हे अनेकदा सिद्ध झाले आहे. या वास्तवाची जाणिव ठेवूनच पक्षाची पुढील वाटचाल झाली पाहिजे.'

कोणतीही महत्वाकांक्षा न बाळगता केवळ कर्तव्यभावनेतून त्यांनी देश व काँग्रेसची सेवा केली. त्यामुळे पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत त्या योग्य व सर्वमान्य निर्णय घेतील, याचा मला पूर्ण विश्वास आहे.' असं ही त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे.