Breaking News

राहाता तालुक्यात वाढत आहेत कोरोना रूग्ण !

राहाता तालुक्यात वाढत आहेत कोरोना रूग्ण !


शिर्डी प्रतिनिधी :
    राहाता तालुक्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे तालुक्यातील विविध गावात कोरोनाच्या रॅपिड टेस्ट घेण्यात येत आहेत,गुरुवार  सकाळ पर्यन्त राहता तालुक्यात दिवसभरात एकूण91 रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या त्यापैकी 25 कोरोना बाधित रुग्णआढळून आले आहेत, राहाता तालुक्यात दररोज कोरोनाच्या रॅपिड टेस्ट वेगवेगळ्या ठिकाणी होत आहेत, त्यामुळे कोरोना रुग्णांची तपासणी झटपट होत आहे व कोरोना बाधित रुग्ण त्वरित आढळून येत असून आज राहता तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी एकूण 91 टेस्ट घेण्यात आल्या, त्यापैकी 25 कोरोना बाधित रुग्ण आढळून
आहेत, या 25 कोरोना बाधित रुग्णांमध्ये राहाता शहरात आठ कोरोणा बाधित रुग्ण आढळून आले आहेत त्याप्रमाणे शिर्डी मध्ये आज नव्याने कोरोना बाधीत 10 रुग्णांची भर पडली आहे ,लोणी येथे तीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आला आहे तर साकुरी येथे तीन कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत व पिंपळस ला एक रुग्ण कोरोना बाधित आढळून आला आहे, असे एकूण 25 कोरोना बाधित रुग्ण आज नव्याने आढळून आले असल्याची माहिती राहत्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली आहे.
     दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे, त्यामुळे नागरिकांनी कोरोना संदर्भात अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे तसेच सामाजिक दुरी, मास्क वापरणे या गोष्टी नागरिकांनी करणे गरजेचे आहे, असेही आवाहन राहाता तहसीलदार कुंदन हिरे यांनी केले.