Breaking News

दुधाला किमान हमी भाव मिळावा यासाठी बेलापूर मधे तिघाडी सरकार च्या विरोधात तीव्र आंदोलन !

दुधाला किमान हमी भाव मिळावा यासाठी बेलापूर मधे तिघाडी सरकार च्या विरोधात तीव्र आंदोलन !
बेलापूर प्रतिनिधी--
भाजपाचे उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष श्री राजेंद्र गोंदकर यांच्या सुचनेनुसार व तालुकाध्यक्ष श्री सुनिल वाणी व श्री सुनिल भाऊ मुथ्था यांच्या मार्गदर्शनाखाली
          महाराष्ट्र सरकारच्या चुकिच्या दुध धोरणामुळे आज दुध उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आला असून कोरोना च्या पार्श्वभूमीवर त्याला जीवन जगणे कठिण होवून बसले आहे. दुधाचा उत्पादन खर्च निघणे सुद्धा मुशकिल झाले आहे. अशा परिस्थितीत दुधाला किमान हमीभाव मिळावा ,तसेच या व्यवसायातील मधले दलाल जे हरामाची मलई खातात त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जावी.दुध उत्पादकांना ३०रू.हमीभाव मिळावा.दूध उत्पादक शेतकरी यांच्या खात्यावर प्रति लिटर १०रु. अनुदान जमा करावे.
अशा मागणीचे निवेदन बेलापूर पोलीस पोस्ट चे पोलीस नाईक श्री. रामेश्वर ढोकणे यांच्याकडे देवुन गरीब कुटुंबातील लोकांना दुध वाटप करुन या तिघाडी सरकारचा निषेध नोंदवला यावेळी बेलापूर भाजपा  शहर अध्यक्ष श्री प्रफुल्ल डावरे, संघटन सरचिटणीस श्री पुरुषोत्तम भराटे, सरचिटणीस श्री राकेश कुंभकर्ण युवा मोर्चा अध्यक्ष धनंजय ( पप्पू ) पोळ यादी उपस्थित होते, 
                  मा.जिल्हाधिकारी साहेब यांच्या कोरोना विषयक अटि व शर्तींच्या अधिन राहून  हे आंदोलन करण्यात आले असून यामधे दुधाची नासाडी न करता गरीब गरजवंतांना या निमित्ताने दुधाचे वाटप करण्यात आले