Breaking News

स्वप्नांना कष्टाचे बळ दिल्यास भावी आयुष्य उज्ज्वल - माजी मंत्री शंकररावजी कोल्हे !

स्वप्नांना कष्टाचे बळ दिल्यास भावी आयुष्य उज्ज्वल - माजी मंत्री शंकररावजी कोल्हे
 ( संजीवनी इंग्लीश मिडीयम स्कुलच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा संपन्न  )
कोपरगाव  / तालुका प्रतिनिधी 
      शिक्षण घेतांना ज्यांनी कष्ट घेतले, ते विदयार्थी आज विविध ठिकाणी उच्च पदावर काम करत आहे, त्यामुळे आपली स्वप्न पुर्ण करण्यासाठी त्याला कष्टाची जोड दिल्यास भावी आयुष्य  नक्कीच उज्ज्वल होते, असे प्रतिपादन माजी मंत्री शंकररावजी कोल्हे  यांनी केले.
        संजीवनी इंग्लीश मिडीयम स्कुल मधील दहावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा माजी मंत्री शंकररावजी कोल्हे साहेब व संस्थेच्या व्यवस्थापकीय समितीच्या सदस्या सौ रेणुका विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत पार पडला. 
याप्रसंगी संस्थेच्या व्यवस्थापकीय समितीच्या सदस्या सौ रेणुका कोल्हे यांनी प्रास्तविक करतांना म्हणाल्या की, सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करताना माजी मंत्री शंकरराव कोल्हे  यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून या भागात शैक्षणिक सुविधा निर्माण केल्या. त्यांच्या दूरदृष्टी तून उभी राहिलेली ही शिक्षण संस्था आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने उत्कृष्ट निकालाची परंपरा या ही वर्षी जपली असल्याचे सौ. कोल्हे म्हणाल्या.
यावेळी माजी मंत्री शंकरराव कोल्हे साहेबांनी मार्गदर्शन करतांना  म्हणाले की, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि योग्य मार्गदर्शन यामुळे यशाचा मार्ग सुखकर होत असतो, त्याकरीता विद्यार्थ्यांनी कष्टाची तयारी ठेवली पाहिजे. कोपरगाव सारख्या ग्रामीण भागातील विदयार्थांना चांगले शिक्षण मिळावे या उद्देशाने सुरू केलेल्या या शिक्षण संस्थेने अनेक विदयार्थी घडवले, आज राज्यातच नव्हे तर देशाच्या कानाकोप-यात आपल्या शाळेच्या विदयार्थी उच्च पदावर काम करीत आहे, त्यांनी निवडलेल्या क्षेत्रात त्यांनी उत्तम कामगिरी केलेली आहे, त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांची गगन भरारी पाहुन मनाला समाधान वाटते. आज उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवले आहे, आपल्या आई वडीलांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कष्टाची जोड दिली तर भावी आयुष्य उज्वल आहे. प्रत्येकाला संधी मिळते फक्त ती शोधण्याचे काम आपण केले पाहिजे. शाळेतील शिक्षक आणि व्यवस्थापनाच्या कौशल्यामुळे या शाळेच्या लौकीकात भर पडत असून दहावीच्या परिक्षेत यशस्वी होण्याची परंपरा आजतागायत सुरू आहे. याचा अभिमान आहे. यावेळी विदयालयात प्रथम आलेल्या कु. साक्षी मांजरे हिचे पालक संजय मांजरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,  आजच्या धावपळीच्या जीवनात पालकांना मुलांसाठी वेळ देणे शक्य  होत नाही, अशा परिस्थीतीत शाळेत पाल्याला योग्य मार्गदर्शन मिळाले तर विदयार्थी चांगल्या प्रकारे घडला जातो, संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये उत्तमप्रकारे मार्गदर्शन मिळाल्यामुळे कु साक्षी हे दैदिप्यमान यश मिळवू शकली असल्याचे सांगितले. दहावीच्या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देउन गौरव करण्यात आला. याप्रसंगी अकॕडमीक हेड हरीभाऊ नळे , प्राचार्य बाळासाहेब जाधव, विद्यार्थ्यांचे पालक व विदयार्थी यावेळी उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे सुञसंचालन छाया सुराळकर , सुमिञा भोसले यांनी केले तर आभार संस्थेचे प्राचार्य बाळासाहेब जाधव यांनी केले