Breaking News

प्रथम राज्यस्तरीय अष्टाक्षरी काव्य स्पर्धेचा निकाल जाहीर !

प्रथम राज्यस्तरीय अष्टाक्षरी काव्य स्पर्धेचा निकाल जाहीर !

  करंजी प्रतिनिधी-
याबाबत सविस्तर वृत्त असे की, ' नाते शब्दांचे साहित्य मंच कोपरगाव ' या व्हॉट्स अप समूहाच्या माध्यमातून दि. १२/०८/२०२० ते  १५/०८/२०२० या कालावधीत ' बैलपोळा ' या विषयावर ' अष्टाक्षरी ' या काव्यप्रकारात प्रथमच राज्यस्तरीय भव्य काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध तालुक्यातून व जिल्ह्यातून एकूण ९८ कवी / कवयित्रीनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता. 
        सदर राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचा निकाल काल दि. २४/०८/२०२० वार सोमवार रोजी रात्री ८:०० वाजता समुहात जाहीर करण्यात आला. सदर स्पर्धेतील विजेते स्पर्धक :- 
    नाते शब्दांचे साहित्य तारा कवी आकाश जाधव, नाशिक   सर्वोत्कृष्ट- कवयित्री कल्पना निंबोकार अंबुलकर, औरंगाबाद.  उत्कृष्ट- कवयित्री अपर्णा नैताम, चंद्रपूर.  कवी अमोल चरडे, पुणे.  प्रथम- कवयित्री प्रतिभा बोंबे, अहमदनगर.  कवी सोमनाथ एखंडे, अकोले ,  कवयित्री स्वाती कोरगावकर, कोल्हापूर.  द्वितीय- कवयित्री कविता वालावलकर, कर्नाटक.  कवयित्री शबाना तांबोळी शेख, कोपरगाव.  कवयित्री गीतांजली वाणी, मुंबई. कवयित्री अनिला मुंगसे, पुणे.  कवी रत्नेश चौधरी, नाशिक  तृतीय- कवयित्री अनुपमा तवर, धुळे,  कवी संदीप सावंत, सिंधुदुर्ग.  कवी दिनेश मोहरील, अकोला.  कवयित्री सुलभा गोगरकर, अमरावती.  कवयित्री गीतांजली साळवी, रायगड.  कवी एन.आर.पाटील, जळगाव  उत्तेजनार्थ -  कवी विजय सानप, औरंगाबाद.  कवी दिलीप काळे, अमरावती.  कवयित्री रेवती साळुंखे, पुणे.  कवयित्री दैवशाला पुरी, मुंबई.  कवयित्री स्वाती लकारे, अहमदनगर.  कवयित्री आरती कोरडकर, कोपरगाव  लक्षवेधी- कवयित्री संध्यारजनी सावकार, नाशिक.  कवयित्री रजनी भालेराव बावस्कार. 

         वरील स्पर्धकांनी विजेत्या पदावर आपले नाव कोरले असून समूहाने समूहाच्या नावाने " नाते शब्दांचे साहित्य तारा " हा पुरस्कार जाहीर केला असून यापुढे समूहाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या स्पर्धेत हा पुरस्कार मिळविणाऱ्या कवी/कवयित्रीचा नियोजित काव्यसंमेलनात सन्मानचिन्ह, गुलाब पुष्प, सन्मानपत्र देऊन यथोचित सत्कार करण्यात येणार असल्याची घोषणा समूह प्रमुख कवी ज्ञानेश्वर शिंदे व कवी पंडित निंबाळकर यांनी समुहात केली आहे. सदर स्पर्धेत हा सर्वोच्च क्रमांक नाशिकचे कवी आकाश जाधव यांनी मिळविला आहे. तसेच सर्व विजेत्यांना आणि सहभागी स्पर्धकांना अतिशय आकर्षक डिजिटल सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
            सदर राज्यस्तरीय अष्टाक्षरी स्पर्धेसाठी येणाऱ्या कवितांचे संकलन कवयित्री आरती कोरडकर यांनी चोख केले असून कवयित्री सौ.कल्पना देशमुख, मुंबई यांनी अतिशय काटेकोर, निःपक्ष, नियमांच्या चौकटीत राहून आणि कमी कालावधीत अधिक वेळ देऊन केलेले आहे.
          श्रावण महिन्यात येणाऱ्या ' बैलपोळा ' या सणाचे औचित्य साधून आणि शेतकऱ्यासोबत अहोरात्र कष्ट करणाऱ्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने या स्पर्धेचे आयोजन केल्याचे ' नाते शब्दांचे साहित्य मंच कोपरगाव ' समूहाचे प्रमुख, ग्राफिक्सकार कवी ज्ञानेश्वर शिंदे यांनी सांगितले आहे.