Breaking News

रजत सांगळे यांची नागपूर येथे विभागीय बँक व्यवस्थापकपदी निवड.

रजत सांगळे यांची नागपूर येथे विभागीय बँक व्यवस्थापकपदी निवड.
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी :
   तालुक्यातील कान्हेगाव येथील रजत दत्तात्रय सांगळे यांची नागपूर येथे विभागीय बँक व्यवस्थापक म्हणून नुकतीच निवड झाली आहे.   शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलचे दत्तात्रय सांगळे यांचा तो मुलगा आहे.
          चिरंजीव रजत सांगळे यांचे दहावीपर्यंत शिक्षण शारदा इंग्लिश मीडियम स्कूल येथे झाले. त्यानंतर एस एस जी एम कॉलेज कोपरगाव येथून तो बारावी उत्तीर्ण झाला.   दोंडाईचा येथील एग्रीकल्चर महाविद्यालयातून तो बीएससी. ऍग्री उत्तीर्ण झाला. त्यानंतर त्याने पुणे येथील वैकुंठभाई मेहता संस्थेतून अकाउंट विषयात एम. बी. ए. शिक्षण पूर्ण केले. ग्रामीण भागात राहून त्याने हे यश संपादन केले आहे. त्याच्या निवडीबद्दल खासदार सदाशिव लोखंडे, माजी मंत्री राधाकृष्ण विखे, सोमय्या उद्योग समूहाचे अध्यक्ष समीरशेठ सोमय्या, आमदार आशूतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन दादा कोल्हे, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजने, गोदावरी बायो रिफायनरीज चे जनरल मॅनेजर  एस.मोहन , सहाय्यक व्यवस्थापक  मधुकर दराडे, अकौंटंट  दिनेश गुप्ता, विश्वस्त सौदागर कुलाल, समन्वयक  अश्विनी शेळके, प्राचार्य के. एल. वाकचौरे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.  त्याच्या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे