Breaking News

विश्व वारकरी सेनेची कोपरगाव तालुका कार्यकारणी जाहीर !

विश्व वारकरी सेनेची कोपरगाव तालुका कार्यकारणी जाहीर
करंजी प्रतिनिधी- 
नुकतीच विश्व वारकरी सेनेची कोपरगाव तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून कोपरगाव तालुका अध्यक्ष पदी ह भ प योगेश महाराज करंजीकर यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी ह भ प बाळासाहेब महाराज कुळधरण, कार्याध्यक्ष पदी रविंद्र आगवन, संपर्क प्रमुख प्रा विजय कापसे, सचिव ह भ प बाबासाहेब महाराज शिंदे,सह सचिव ह भ प शंकर महाराज गोंडे, कोषाध्यक्ष ह भ प विनायक महाराज टेके या मान्यवरांची निवड करण्यात आली आहे अशी माहिती विश्व वारकरी सेनेचे कोपरगाव तालुकाध्यक्ष ह भ प योगेश महाराज करंजीकर यांनी संगीतले आहे.
  या वेळी महाराजांनी नव नियुक्त सदस्याचा सन्मान करतांना सांगितले की आज कुठलेही धार्मिक सामाजिक कार्य हे  संघटनेशिवाय होत नसते हा उद्देश डोळ्यासमोर ठेवत ह भ प अरुण महाराज बुरघाटे यांनी विश्व वारकरी सेनेची स्थापना करून धार्मिक व वारकरी क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांना सोबत घेत भारत भर संघटनेकडून सामाजिक व धार्मिक कार्य करण्यास सुरुवात करून एक उल्लेखनीय कार्य समाजापुढे मांडत आहे याचाच भाग म्हणून कोपरगाव तालुका वारकरी संघटना देखील सामाजिक व धार्मिक कार्यात वाखण्याजोगे काम करेल यात शंकाच नाही.
   सर्व सदस्यांच्या निवडीबद्दल युवा जिल्हा अध्यक्ष ह भ प गोरक्षनाथ देठे महाराज, उपाध्यक्ष  ह भ प ईश्वर महाराज नरेंद्र गुंजाळ, ह भ प सोपान काका करंजीकर, रयत शिक्षण संस्थेचे कौन्सिल सदस्य कारभारी आगवन, संजीवनी साखर कारखाना संचालक भास्कर भिंगारे, ओम साई ग्रामिण शिक्षण संस्था कोपरगाव चे अध्यक्ष परशराम साबळे तसेच कोपरगाव तालुक्यातील व करंजी गावातील समस्त भजनी मंडळ व ग्रामस्थांनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.