Breaking News

घरच्या घरी गणपती बनविण्याचा स्पर्धेत अक्षदा वानखेडकर द्वितीय !

घरच्या घरी गणपती बनविण्याचा स्पर्धेत अक्षदा वानखेडकर द्वितीय


करंजी प्रतिनिधी -
      संजीवनी युवती प्रतिष्ठान च्या मार्गदर्शिका रेणूकाताई कोल्हे यांनी कोपरगाव वासीयांना या कोरोनाचा महामारीत बाहेरून गणेश मूर्ती न आणता घरगुती पध्दतीने शाडू च्या माती पासून पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनवावी असे आव्हान करत स्पर्धेत ऑनलाईन फोटो पाठवून सहभागी आयोजन केले त्यास प्रतिसाद देत कोपरगाव शहरातील असंख्य युवती सहभागी झाल्या होत्या.
या स्पर्धेत कोपरगाव औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे शिक्षक हेमंत वानखेडकर यांची कन्या अक्षदा हीने द्वितीय क्रमांक मिळवला असून तिने ही गणेश मूर्ती शाडू मातीपासून पर्यावरण पूरक इको फ्रेंडली अशी तयार केली आहे.
   तिच्या या यशाबद्दल संजीवनी युवती प्रतिष्ठान च्या रेणुका कोल्हे यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.