Breaking News

दुकानातून सामान खरेदी करायची आहे म्हणून, विश्वासाने केली दहा हजार रुपये व मोबाइलची चोरी !

दुकानातून सामान खरेदी करायची आहे म्हणून, विश्वासाने केली दहा हजार रुपये व मोबाइलची चोरी !
---------
आरोपीस पोलिसांनी केली अटक
पारनेर प्रतिनिधी - 
      पारनेर येथील एका दुकानांमध्ये सामान खरेदी करायचे आहे म्हणून सुट्टे पैसे मागून गल्यातील दहा हजार रुपये व एक मोबाईल एकाने चोरून नेला याबाबत गुन्हा पारनेर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी अटक आहे.
  याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पारनेर येथे मिराबाई पोपट खोडदे वय 65 धंदा दुकान रा लोणी रोड ता. पारनेर,अ. नगर यांच्या दुकानात आरोपी संजय रावसाहेब कापरे ऊर्फ औटी रा.पारनेर अ. नगर याने प्रत्येकी 4 कि सामान खरेदी करावयाचे अहे असे सांगुन फिर्यादी महिला सामानाची पॉकिंग करित असताना तिच्या कडे सुट्टे पैसे मागून, महिलेचा भाचा अर्जुन कुलट याचेकडून गल्ल्यातील पैशामधुन 10 हजार रुपये विश्वासाने प्राप्त करून, तांदुळ भरण्याकरिता मोटार-सायकल ला लावलेल्या पिशव्या घेऊन येतो असे सांगुन घेतलेले 10 हजार रुपये व जाता जाता काउंटरवर ठेवलेला सँमसंग कंपनीचा1000रुपये किंमतीचा मोबाईल असा एकूण 11000 रुपये मुद्देमाल अपहार करून लबाडीच्या इराद्याने चोरुन घेऊन गेला आहे याबाबत महिला मीराबाई पोपोट खोडदे यांनी फिर्याद दिली त्यानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी करत आहेत