Breaking News

पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या राज्यप्रसिद्धी प्रमुखपदी रमेश खरबस यांची निवड !

पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या राज्यप्रसिद्धी प्रमुखपदी रमेश खरबस यांची निवड
अकोले/प्रतिनिधी :
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ च्या  राज्यप्रसिद्धी प्रमुखपदी अकोले येथील उपक्रमशील शिक्षक रमेश हरिभाऊ खरबस यांची निवड करण्यात आली आहे.
      मंडळाचे संस्थापक  वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांनी रमेश खरबस यांना नुकतेच निवडीचे पत्र दिले आहे.बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले रमेश खरबस यांना निसर्ग,वन्यजीव व पर्यावरण तसेच वृक्ष लागवड व संवर्धन याची विशेष आवड आहे.तसेच त्यांनी यापूर्वी शासनाच्या वतीने राबविलेल्या ग्रामस्वच्छता अभियान दरम्यान  सहा ते सात वर्षे स्वतः कीर्तनाच्या माध्यमातून राज्यभरात ग्रामीण भागात जाऊन ग्रामस्थांना व शालेय स्तरावर स्वच्छता व पर्यावरण याविषयी निस्वार्थपणे प्रबोधन केलेले आहे.याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनीही गौरविण्यात आलेले आहे. 
     रमेश खरबस यांच्या या निवडीबद्दल निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण राज्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब मोरे ,कार्याध्यक्ष विलास महाडीक(रत्नागिरी),सचिव प्रमोद मोरे( नगर),सल्लागार हवामान तज्ञ बी.एन.शिंदे(नगर),सल्लागार नेत्रतज्ज्ञ डॉ.प्रकाश कांकरिया(नगर),आर्थिक सल्लागार राज देशमुख(नगर) तसेच राजेश परांजपे(कोकण)
डॉ.सिमा भापकर(पुणे),प्राचार्य उल्का कुरणे(नाशिक),
डॉ.ललिता जोगदंड(मुंबई),सुलेखा पाटील(सातारा),
प्रा.डॉ.शारदा वैद्य(नागपूर),मनोहर चासे(ठाणे),
डॉ.महेंद्र घागरे,(पुणे),प्रा.अविनाश कुमावत(जळगांव), अँड.अनुराधा येवले(नगर),दिलीप धोंडरे(गडचिरोली),
शमशाद बागवान(सोलापूर),बाळासाहेब चोपडे(सांगली),ज्ञानेश्वर कराळे(नांदेड),उमाजी भिसेन(भंडारा),
गोरक्षनाथ शिंदे(पुणे),डॉ.अतुल निगवेकर(सातारा)
प्रा.महंमद हुसेन अब्दुल गणी पाटील(कोल्हापूर)आदींसह सदस्यांनी अभिनंदन केले आहे.

-