Breaking News

अकोले तालुक्यात ठिकठिकाणी दूध आंदोलन!

अकोले तालुक्यात ठिकठिकाणी दूध आंदोलन!                                   
अकोले प्रतिनिधी :
    दूध भाव वाढीसाठी अकोले तालुक्यात आज ठीक ठिकाणी दूध दरवाढ आंदोलन करण्यात आले  शेतकरी नेते डॉ अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली टाकळी येथे दूध दरवाढी साठी आंदोलन  करण्यात आले   आंदोलनाची दखल घेतली नाहीतर राज्यकर्त्यांच्या दारात आंदोलन करू असा इशारा यावेळी डॉ अजित नवले यांनी दिला.
अकोले तालुक्यात माजी आमदार   वैभवराव पिचड यांनीही भाजपचे वतीने राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात  आंदोलन करत प्रशासनाला निवेदन दिले 
शेतकरी नेते कॉ. डॉ. अजित नवले, युवा स्वाभिमान संघटनेचे संस्थापक महेश नवले, भाकपचे ज्येष्ठ नेते कॉ. कारभारी उगले, कॉ  शांताराम वाळुंज, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शरद देशमुख, ज्येष्ठ नेते अशोकराव आरोटे, अगस्ती कारखान्याचे संचालक गुलाबराव शेवाळे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रामहारी तिकांडे, संभाजी ब्रिगेडचे डॉ. संदीप कडलग, सोमनाथ नवले, दूध उत्पादक संघर्ष समितीचे सुरेश नवले, रोहिदास धुमाळ, सचिन शेटे, स्वप्निल नवले, सुनील पुंडे आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते . 
दूध उत्पादक शेतकरी सरकारच्या विरोधी घोषणा देत काळ्या फिती लावून आंदोलन करत  दूध रस्त्यावर ओतून  आंदोलन केले.
ग्राहक पंचायतीचे मच्छीन्द्र मंडलिक व त्यांच्या सहकाऱ्यांनी माळीझाप गुरवझाप  येथे तर उंचखडक  येथे ही आंदोलन करण्यात आले 
कोतुळ येथे चौकात दगडाला दुग्धअभिषेक घालत  शेतकऱ्यांनी आज सकाळी आंदोलन केले शेतकऱ्यांच्या गायीच्या दुधाला प्रतिलिटर किमान30 ते 40 रुपये भाव मिळावा  या मागणी सह दुधाला दहा रुपये  अनुदान मिळावे दूध भुकटी आयातीचे धोरण रद्द करावे  या मागणी  साठी कोतुळ येथे महाराष्ट्र राज्य किसान सभा व  दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती मुळा खोरे चे  वतीने दूध एल्गार आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते भारतीय किसान सभेचे कॉ सदाशिव साबळे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले
शेतकऱ्यांनी दुधाच्या भरलेल्या किटल्या दगडावर ओतून  सरकारी धोरणाचा निषेध केला व दुध दरवाढी ची मागणी केली करोन काळात दूध भाव पडल्याने  शेतकऱयांना जगणे मुश्किल झाले आहे जनावरे सांभाळणे त्यांचा चारा पाणी ,खाद्य यांचा खर्च करणे अवघड झाले आहे  असे  सदाशिव साबळे यांनी यावेळी सांगितले ,रवींद्र आरोटे , राजेंद्र पाटील देशमुख,नामदेव साबळे, भाऊसाहेब देशमुख,भानुदास देशमुख,दत्तात्रय गीते प्रकासब देशमुख,गणेश जाधव,सुरेश देशमुख ,बाळासाहेब देशमुख,गौतम रोकडे ,देवराम डोके,सोमनाथ पवार, आदी उपस्थित होते
१५ते २०  रुपये प्रतिलिटर मिळणारा बाजारभावात खर्च देखील फिटत नसल्याने दूध व्यवसाय तोट्यात चालला आहे असे दूध उत्पादकांनी यावेळी सांगितले
-------