Breaking News

तहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न !

तहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न !
------------
अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण्याचा प्रयत्न !
------------

कोरोनातुन सावरत असताना वाळू माफियाच्या हल्ल्यातून बालबाल बचावल्या तहसीलदार !

पारनेर प्रतिनिधी-
    पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे तहसीलदार ज्योती देवरे यांनी एका वाळूचा हायवा डम्पर अडवण्याचा प्रयत्न केला असता ड्रायव्हरने हायवा गाडी तहसीलदार देवरे यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न करुन तो तेथून पसार झाला गाडीचा पाठलाग तहसीलदार ज्योती देवरे यांनी वासुंदे पर्यंत केला परंतु अंधाराचा फायदा घेऊन तो पळून जाण्यात यशस्वी झाला.
    या हायवा मालकाचे नाव संदीप रांधवण वर ड्रायव्हर चे नाव भाऊ भगत असून दोघांवरही सरकारी कामात अडथळा आल्यामुळे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
     तालुक्यांमध्ये अनेक वेळा वाळू अवैध वाळू वाहतूक करणारे दहशत करत असतात मात्र प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न झाला यामध्ये तहसीलदार ज्योती देवरे या बालबाल बचावल्या पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले आहे.
    हा डंपर वाळूने भरलेला होता व ड्रायव्हरला अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी थेट पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यानंतर तहसीलदार  देवरे यांनी टाकळी ते वासुंदे पर्यंत डंपरचा पाठलाग केला मात्र अंधाराचा फायदा घेऊन हा डंपर चालक फरार झाला आहे.