Breaking News

अकोले तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकारी निवडी जाहीर.!

  अकोले तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकारी निवडी जाहीर.!
 राजूर प्रतिनिधी :
     अकोला तालुका पत्रकार संघाची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संघाचे मावळते अध्यक्ष नंदकुमार मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या प्रारंभी संघाचे मावळते सेक्रेटरी श्रीनिवास रेणुकादास यांनी सर्वांचे स्वागत व गतवार्षिक सभेचे इतिवृत्त वाचन केले. यानंतर पदाधिकारी व कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. 
        यामध्ये विश्वस्तपदी ज्येष्ठ पत्रकार प्रा. बाळासाहेब मेहेत्रे, श्रीनिवास रेणुकादास, नंदकुमार मंडलिक, गोकुळ कानकाटे, सुनील गिते, राजेंद्र जाधव, उपाध्यक्षपदी - विजय समुद्र, संजय महानोर, विनायक घाटकर, सचिन खरात, सहसेक्रेटरी राजेंद्र देशमुख, खजिनदार हरिभाऊ आवारी, सह खजिनदार भगवान पवार, प्रकल्प प्रमुख गोरक्ष घोडके, संपर्क प्रमुख आबासाहेब मंडलिक, प्रसिद्धी प्रमुख ललित मुतडक याची निवड करण्यात आली असून याबैठकीस रमेश खरबस, युवराज हंगेकर आदी उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.