Breaking News

मागेल त्याला शेततळे योजने मध्ये शतकवीर कृषी सहाय्यक झाले जलदूत,आढळगावात शेततळ्याचे झाले शतक !

मागेल त्याला शेततळे योजने मध्ये शतकवीर कृषी सहाय्यक झाले जलदूत,आढळगावात शेततळ्याचे झाले शतक !


श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी :
     तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वात मोठे गाव म्हणून आढळगाव ची ओळख आहे या गावाला मागील काही वर्षांपासून कृषी विभागाचे अधिकारी असतात हेच माहिती नव्हते पण 
विदर्भातून बदली करून आलेले कृषि सहाय्यक पी.जी.देवकाते यांनी  अवघ्या काही दिवसातच आपल्या कामाचा ठसा उमटविला आणि मागेल त्याला शेततळे योजने मध्ये 100 च्या वर शेततळी करून शतकवीर ठरले आहेत त्यामुळे कृषी सहाय्यक झाले जलदूत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही . 
श्रीगोंदा तालुक्यातील अतिसंवेदनशील गाव म्हणून आढळगाव ची ओळख आहे या गावात गेल्या वर्ष भरापूर्वी असणाऱ्या कृषी सहाय्यकाच्या शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या त्यामुळे त्यांच्या कडील पदभार काढून प्रतीक कांबळे यांचेकडे काही दिवसासाठी पदभार  दिला होता त्यांच्या काळात गावाला कृषी सहाय्यक असतो हे समजले त्यांनतर पी जी देवकाते यांची विदर्भातून आढळगाव ला बदली झाली देवकाते यांनी अतिशय नियोजन बद्ध पद्धतीने गावाचा अभ्यास केला.
अचूक नियोजन व तांत्रिक बाबी विचारात घेऊन त्यांनी गावात कामाचा सपाटा लावला आहे आगोदर कृषि विभागाबद्दल गावातील लोकांची खूप नाराजी होती पण देवकाते आल्यापासून शेतकरी वर्ग खूष होताना दिसत आहे.शेततळे,अस्तरीकरण,यांत्रिकीकरण,गोपीनाथ मुंडे अपघात विमा, आपत्ती चे पंचनामे, पिक व्यवस्थापन,पीक विमा या मध्ये लोकांन मध्ये जनजागृती करून उल्लेखनीय कामगिरी केली यांनी शेतकरी वर्गाचे खरे सेवाभावी कृषी जलदूत झाले. लॉक डाऊन मध्ये शासनाने सांगितलेल्या नियमांचे काटेकोर पालन करून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 10 हेक्टर च्या वर फळबाग लागवड केली.अगोदर शेततळे नंतर फळबाग केल्याने संरक्षीत पाणी उन्हाळ्यात फळपिकांना  उपलब्ध होईल असे अचूक नियोजन देवकाते यांनी केले.या पुढे ते शेततळ्यात मच्छी पालन व  मधुमक्षिका पालन यावर काम करण्याचा त्यांचा मानस आहे असे ते म्हणाले अशा प्रकारे कृषी विभागाचे उल्लेखनीय कामे करणारा आढळ गाव चे शतकवीर पी.जी.देवकाते यांना  तालुका कृषी अधिकारी म्हस्के ,मंडळ अधिकारी शीतल आरु ,सांगळे,मुळे  आदींचे मार्गदर्शन लाभले 

  • शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळं काम करणे शक्य -देवकाते 
  • आढळगाव चे शेतकरी अतिशय होतकरू आहेत तरुण शेतकऱ्यांनी फळबागा करताना हि नियोजन बद्ध केल्या आहेत शेतकरी होतकरू असल्यामुळे काम करण्यास उत्साह वाढला त्यामुळेच आढळगावात शेततळे उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम करू शकलो ,यापुढेंही शेततळ्यात मासे सोडून शेतकऱ्यांनी पर्यायी व्यवसाय सुरु करावा यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे पी जी देवकाते यांनी सांगीतले