Breaking News

अतिवृष्टीत उध्वस्त कुटुंबियांना पत्रकार संघाने दिला दिलासा !

अतिवृष्टीत उध्वस्त कुटुंबियांना पत्रकार संघाने दिला दिलासा !
  राजूर/प्रतिनिधी-   
अकोले तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गेली काही दिवस जोरदार पाऊस होत असुन, या पावसाने या भागातील जनजीवन  विस्कळीत झाले आहे  शेतकर्यांच्या भातपिकासह घरांचीही पडझड मोठ्या प्रमाणात झाली आहे. अतिवृष्टीत  वाकी येथील श्री हनुमंत बाळु सगभोर यांचे घर जमिनदोस्त झाले आहे . काही क्षणात होत्याचे नव्हते झाले.
         सगभोर कुटुंब उघड्यावर पडले ना पंचनामा ना मदत अखेर हवालदिल झालेल्या सगभोर कुटुंबीयांनी आपली व्यथा अकोले तालुका पत्रकार संघाकडे मंडळी संघाचे अध्यक्ष विलास तुपे , सचिव  सुभाष खरबस  विश्वस्त प्रा. बाळासाहेब मेहेत्रे, नंदकुमार मंडलिक गोकुळ कानकाटे, श्रीनिवास रेणुकादास सुनील गीते व सर्व पदाधिकारी, सदस्यांनी सगभोर कुटुंबियांना तातडीने सहकार्य  करण्याचा निर्णय घेतला   या परिवाराला  लवकरात लवकर मदत मदत  मिळावी या मागणीचे निवेदन संघाचे वतीने तहसिलदार मुकेश कांबळे व पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्याॅना देण्यात आले. संघाचे अध्यक्ष विलास तुपे, सेक्रेटरी सुभाष खरबस, प्रा. बाळासाहेब मेहेत्रे, श्रीनिवास रेणुकादास, नंदकुमार मंडलिक, आबासाहेब मंडलिक, ललित मुर्तडक, भगवान पवार व सदस्य उपस्थित होते.